आमच्या बद्दल सर्व काही माहिती

  • कंपनीचा परिचय

    मुद्रा / G-सेवा सर्व्हेक्षण कम्प्युटर कंपणी ही सन २००७ पासून कार्यरत आहे. आमची कंपनी ग्रामपंचायत क्षेत्रात ग्रामपंचायतीच्या निगडीत काम करते.

  • कंपनीच्या सेवा

    कंपनी मार्फत ग्रामपंचायत स्तरावरील मालमत्ता शासनाने दिलेल्या धोरणा प्रमाणे निश्चित करणे, त्याची कर आकारणी करणे याबद्दल सुनिश्चित शासनाने ठरवून दिलेल्या नमुण्यात संगणीकृत दफ्तर तयार करून देणेची सेवा दिली जाते.

  • तंत्रज्ञान आणि अचूकता

    कंपनीने स्वतःची संगणकीय प्रणाली निर्माण करून कामात अचुकता निर्माण केली आहे. कंपनी ग्रामपंचायतील मालमत्तेचे मोजणी करून कर आकारणी करणे व दफ्तर तयार करून देणे बाबत मार्गदर्शन करते.

  • कर्मचारी आणि पारदर्शकता

    तांत्रिक व अनुभवी बेरोजगार कर्मचारी कंपनीत काम करतात. पारदर्शकतेची हमी देण्यात येते आणि बदल पंचायतीच्या मंजूरीनेच केले जातात.

  • नमूना ८ मालमत्ता रजिस्टर

    संगणकीय प्रणाली द्वारे नमूना ८ मालमत्ता रजिस्टर तयार करून दिले जाते. यामुळे पूर्ण अचुकता सुनिश्चित केली जाते. नमूना ८ मालमत्ता रजिस्टर हे महत्त्वाचे दस्तऐवज असून इतर संबंधित नमुने वेळेवर तयार केले जातात.

  • कराची मागणी आणि वसूली

    रजिस्टर मध्ये कराची मागणी व वसूली सुनिश्चित व बरोबर संगणकीय प्रणाली द्वारे तयार केले जाते, ज्यामुळे भ्रष्टाचाराला वाव मिळत नाही. वर्षाच्या सुरूवातीला ग्रामपंचायत खातेदारांना एकाच वेळी कराची मागणी, बिल आणि लेख तयार करण्यात येतात, ज्यामुळे वसूलीची वाढ होते.

  • नागरिकांची तक्रार आणि समाधान

    संगणकीय प्रणाली द्वारे कार्य केल्याने नागरिकांच्या तक्रारीला वाव मिळत नाही.

  • कंपनीची नोंदणी आणि कायदेशीरता

    कंपनीने मुंबई दुकाने व संस्था अधिनियम १९४८ अंतर्गत नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त केले आहे आणि सेवा कराची नोंदणी करून नियमित कर शासनास जमा केले जाते.

  • शासन धोरणांचे पालन

    कंपनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ आणि महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखा संहिता २०११ नुसार लागू केलेल्या सर्व नमुने वाजवी भावाने उपलब्ध करून देते.

  • ग्रामपंचायतींसाठी केलेले काम

    कंपनीने मार्च २०१५ पर्यंत २१३ ग्रामपंचायतीची मालमत्तेची मोजणी करून कर आकारणीचे काम केले आहे. त्यानंतर नियमित सेवा त्या ग्रामपंचायतीला देण्यात येते. कंपनीने अमरावती विभागातील ५०० पेक्षा जास्त ग्रामपंचायती जोडल्या आहेत आणि सेवा व मार्गदर्शन प्रदान केले जाते.

  • कंपनीचे ध्येय

    कंपनीचा ध्येय नफा कमावणे नसून, वाजवी दराने, योग्य दर्जाचे व आकर्षक लेखन साहित्य पुरवणे, पारदर्शीपणे ग्रामपंचायतीला सेवा पुरविणे, व ग्रामीण भागातील बेरोजगार तांत्रिक युवकांना काम देणे आहे. तसेच ग्रामपंचायतीच्या लेख्यात अचूकता निर्माण करणे हे आहे.

  • शासननियमांनुसार काम

    कंपनी शासनाने ठरवून दिलेल्या नमुण्यातच व मार्गदर्शक तत्त्वानुसार काम करते. तयार केलेले नमुने संबंधित ग्रामसेवक, सरपंच, विस्तार अधिकारी (पंचायत), गट विकास अधिकारी यांचे मार्गदर्शन घेऊन अचूक व सूटसुटीत छपाई केली जाते.

  • ग्रामपंचायतींच्या स्वराज्याचे महत्त्व

    राज्यसरकारने ग्रामपंचायतींना स्वराज्याचे घटक म्हणून मोठ्या प्रमाणात अधिकार व प्राधिकार दिले आहेत, जेणेकरून ग्रामपंचायतीचे काम प्रभावीपणे पार पाडता येईल. संगणकीय प्रणालीमध्ये एका नमुण्यात माहिती भरल्यानंतर इतर संबधीत नमुन्यात माहिती एकाच वेळी भरण्यात येते, ज्यामुळे वेळेची बचत होते व पारदर्शकता निर्माण होते.